Maharashtrian Thin Poha Chivda Recipe

[belowtitlead]

Ingredients

 • Thin poha – 1/2 kg
 • Daliya / Roasted Chana Dal – 1 cup
 • Whole raw peanuts – 1/2 cup
 • Powdered Sugar – half cup
 • Coriander seeds – 4 tbsp
 • Cloves of garlic – 8-10
 • Curry leaves – 5-6 strands
 • Mustard seeds – 1 heaped tbsp
 • Cumin seeds – 1 heaped tbsp
 • Asafoetida – 1/2 tsp
 • Red chili powder – 1 heaped tbsp
 • Turmeric powder – 1 tsp
 • Oil – 1/3 cup
 • Salt to taste

Procedure

1. First crush the coriander seeds in a mortar and pestle. Keep it aside.

2. Heat oil in a large pan. Add mustard seeds, cumin seeds, asafoetida and curry leaves. Let them splutter. Add crushed coriander seeds and saute for few seconds. Then add peanuts and fry till they get slight brown color.

3. Add chopped garlic and saute till raw smell goes away. It will take few seconds.

4. Add daliya and saute for a minute.

5.Reduce the heat. Add red chili powder, turmeric powder and salt to taste. Start adding small quantity of poha at a time and keep mixing with spices.

6. Keep mixing the poha continuously so that it won’t burn at bottom. Roast for 10-12 minutes on low heat till poha turns crispy.

7.  Transfer it to a big container. Add powdered sugar to warm chivda. Mix it really well. Let it cool down completely. Store chivda in a air tight container.

[belowpostad]

Maharashtrian Thin Poha Recipe in Marathi

पातळ पोह्याचा चिवडा

साहित्य

 • पातळ पोहा – १/२ किलो
 • भाजलेली चणा डाळ – १ कप
 • शेंगदाणे – १/२ कप
 • पिठीसाखर (दळलेली साखर) – १/२ कप
 • धने – ४ टेस्पून
 • लसूणच्या पाकळ्या – ८-१०
 • भरपूर कडीपत्ता
 • मोहरी – १ टेस्पून
 • जिरे – १ टेस्पून
 • हिंग – १/२ टीस्पून
 • लाल मिरची पावडर – १ टेस्पून +१/४ टीस्पून
 • हळद – १ टीस्पून
 • तेल – १/३ कप
 • चवीपुरते मीठ

 कृती

1. प्रथम धने खलबत्त्या मधे ठेचून घ्या. त्याची पावडर होणार नाही याची काळजी घ्या.

2. एका जड बुडाच्या कडई मधे मध्यम आचेवर तेल गरम करा. गरम तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग आणि कडीपत्ता टाकून फोडणी दया . नंतर शेंगदाणे आणि धने घालून शेंगदाणे चांगले ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.

3. आता लसून आणि भाजलेली चणा डाळ घालून मिक्स करून घ्या.

4. नंतर आच कमी करा आणि लाल मिरची पावडर, हळद आणि चवीपुरते मीठ घाला. चांगले ढवळून घ्या. आता थोडे थोडे पोहे टाकून ढवळत राहा.सर्व मसाला पोह्यांना लागला पाहिजे आणि पोहो कुरकुरीत झाला पाहिजे. यासाठी १५-२० मिनिट एकसारखे मिक्स करत राहावे लागेल, नाहीतर पोहे तळाला करपण्याची शक्यता असते.

5. गॅस बंद करून मोठ्या डब्यामध्ये चिवडा भरून ठेवा. चिवडा गरम असतानाच त्यात पिठीसाखर घालून चांगले ढवळून घ्या.

6. चिवडा थंड झाला कि सर्व्ह करा. चिवडा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा.

 काही टीप

1. तुम्ही चिवड्या मधे काजू आणि मनुके हि घालू शकता. शेंगदाणे सोबत काजू मनुके हि घालून परतून घ्या.

2. चिवड्या मधे थोडी आमचूर पावडर हि घालू शकता, त्याने छान चव येते.

3. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल. तर लाल तिखट कमी घाला अथवा फक्त हिरवी मिरची घालून लाल रंगासाठी बेडगी मिरची पावडर वापरू शकता.

4. लसणाच्या पाकळ्या ऐवजी लसून पावडर हि घालू शकता.